महाराष्ट्र पोलीस भरती 2025 | १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी OMR System चा वापर
मुंबई, दि. १२ -Maharashtra Police Recruitment 2025 मध्ये शिपायांची सुमारे १५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरिता सन २०२४-२५ च्या Police Constable Recruitment Process ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते.
या भरतीमध्ये सन २०२२ व २०२३ मध्ये संबंधित पदाची Age Limit ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष संधी म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
राज्याच्या पोलीस दलात २०२४ मध्ये रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती केली जाणार आहे. Vacancy Details खालीलप्रमाणे:
पोलीस शिपाई – १०,९०८
पोलीस शिपाई चालक – २३४
बॅण्डस् मॅन – २५
सशस्त्री पोलीस शिपाई – २,३९३
कारागृह शिपाई – ५५४
पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे Group C Posts आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया जिल्हास्तरावर राबवली जाईल आणि त्यासाठी OMR Based Written Exam होणार आहे.
भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया, उमेदवारांची Physical Test, आणि पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याचे अधिकार Additional Director General of Police (प्रशिक्षण व खास पथके विभाग) यांना देण्यात आले आहेत.
राज्यातील Law and Order सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास Police Force वर ताण वाढतो. या पार्श्वभूमीवर High Court आणि Supreme Court ने वेळोवेळी पदे लवकर भरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच विधिमंडळातील चर्चेत लोकप्रतिनिधींकडूनही ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा