DLM ADVT

0


 BEED  - उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे दोन दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी अतिशय बारकाईने पाहणी केल्याचं पाहायला मिळालं. सुरुवातीला त्यांनी कार्यकर्त्यांना चप्पल घालून येऊ नका, म्हणत दम भरला. त्यानंतर त्यांनी दरवाज्याच्या स्क्रू पासून त्यांनी बारकाईने पाहणी केली.

 यादरम्यान त्यांनी तपासणी कक्षात बसवलेल्या AC ची पाहणी केली. यावेळी त्यांना AC च्या खालच्या बाजूला लावलेले सिमेंट फिनिशिंगमध्ये लावलं नसल्याचं दिसलं. यावर त्यांनी हे असं का म्हणत.. "मी सिमेंट लावायला येतो. आज दुपारी वेळ काढतो अन् टचअप काढायला येतो" असं म्हणत पवारांनी डॉक्टरांना सुनावले. यानंतर त्यांनी इमारतीत थम मशीनला लटकणाऱ्या वायरवरून देखील डॉक्टरांचे कान टोचले.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top