30 ऑगस्ट रोजी मुकुंदवाडी पोलिसांनी अंबिका नगर परिसरात मोठी कारवाई करत दीड किलो चरस जप्त केले होते. या प्रकरणातील आरोपींवर पुढील तपास सुरू ठेवताना पोलिसांनी आरोपींच्या निवासस्थानावर झडती घेतली आहे.
मुकुंदवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने रहेमानीया कॉलनी, कटकट गेट परिसरातील आरोपींच्या घरावर झडती टाकली. या कारवाईत पोलिसांनी परिसराची सखोल पाहणी केली.
मुकुंदवाडी पोलीस तपासादरम्यान अंमली पदार्थ विक्रीच्या मोठ्या रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी आरोपींचे घर आणि आसपासचा परिसर तपासून महत्त्वाची माहिती जमा केली आहे. या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असून, तपासाची सूत्रे राज्याबाहेरही पोहोचू शकतात.
अंमली पदार्थांच्या अवैध धंद्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली असून या प्रकरणाची सखोल चौकशी पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा