DLM ADVT

0

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आनंदनगर वसाहतीत राहणारा श्रावण अजित गावडे हा दहा वर्षांचा चिमुकला बुधवारी रात्री मित्रांसोबत खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. 

तो घरी धावत येऊन आईच्या कुशीत विसावला  आणि तिथेच त्याने जगाचा निरोप घेतला. तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने श्रावणचा जागीच मृत्यू झाला. आईच्या डोळ्यासमोर मुलाने शेवटचा श्वास घेतल्याने कुटुंबासह अख्ख्या परिसराला धक्का बसला आहे. 

कुटुंबीयांनी तातडीने श्रावणला रुग्णालयात नेलं होतं, पण डॉक्टरांनी श्रावणला मृत घोषित केले. या गावडे कुटुंबाने तीन वर्षांपूर्वी आपल्या मुलीलाही हृदयविकारामुळेच गमावलं होतं. अल्पावधीत दोन मुलं गमावल्याने गावडे कुटुंबावर पर्वताएवढं दुःख कोसळलं आहे. गणेशोत्सवाच्या वातावरणातच ही अशी घटना घडल्याने संपूर्ण गाव हादरुन गेलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top