- राजापूरच्या हातीवले टोल नाका दरम्यान हा अपघात घडला आहे
- या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
- मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जाणारी महिंद्रा मेराझो कार अचानक थेट ट्रकच्या खाली घुसली आणि त्यामुळे हा भीषण अपघात झाला.
- अपघातानंतर लगेचच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
- मुंबई - गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा