DLM ADVT

0

- महाराष्ट्र राज्य बालवाडी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने वर्ध्यात जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी धरणे आंदोलन देखील करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड दिलीप उटाने यांनी केले आहे. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना समान वेतन, दरमहा पेन्शन तसेच ग्रॅच्युटी द्यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.  योजनेच्या व्यतिरिक्त कामे अंगणवाडी सेविकांना दिली जातात. त्यामुळे अंगणवडीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. 

परिणामी पालक देखील मुलांना अंगणवाडीत प्रवेश करण्यासाठी धजावत नाही. त्यामुळे मुलांना शिकवायचे की इतर अतिरिक्त कामे करायची असा प्रश्न या मोर्चातून प्रशासनाला विचारण्यात आला आहे. मोठ्या संख्येने वर्धा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी या मोर्चात सहभागी झाले आहे. 

वर्ध्याच्या रेल्वे स्थानक परिसरातून हा मोर्चा निघालाय. बजाज चौक, इतवारा, झाशी राणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे हा मोर्चा जिल्हा परिषद येथे पोहचला. या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top