डीसीपी प्रशांत स्वामी यांनी सांगितले की, आम्हाला येथे बनावट कॉल सेंटर चालवले जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या टीपवर कारवाई करत काल रात्री छापा टाकण्यात आला. आतापर्यंत 116 जणांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमेरिकेतील नागरिकांशी कॉलद्वारे संपर्क साधत असत आणि कर आणि इतर योजनांच्या नावाखाली त्यांची दिशाभूल करत असत. त्यांचा कर थकीत असून त्यांनी काही रक्कम तात्काळ भरल्यास प्रकरण निकाली निघेल, असे त्यांना सांगण्यात आले. यासाठी त्यांना गिफ्ट कार्ड खरेदी करून त्यांचे रिडेम्पशन कोड शेअर करण्यास सांगितले होते, ज्याद्वारे पैसे ट्रान्सफर करून फसवणूक केली जात होती.
ताब्यात घेण्यात आलेले बहुतांश आरोपी हे ईशान्येकडील राज्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे. कॉल सेंटरशी संबंधित मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा