DLM ADVT

0


 जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रस्त्यांवरच्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, अखेर महानगरपालिकेने त्यावर ठोस पावलं उचलली आहेत. मनपाच्या वतीने सध्या कुत्र्यांना पकडणं, निर्बिजिकरण आणि लसीकरण या मोहिमेला सुरुवात झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेला साधारण तीन दिवस लागतात. 

दररोज सरासरी पाच ते आठ कुत्र्यांवर ही प्रक्रिया केली जाते. अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम यांनी सांगितलं की, “ही मोहीम आता अधिक गतीने राबवली जाणार आहे. भोकरदन नाका परिसरातील मनपाच्या इमारतीतही ही प्रक्रिया सुरू होईल,



 ज्यामुळे शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणता येईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. यावेळी त्यांनी नागरिकांना सावधानतेचं आवाहन केलं की, रात्रीच्या वेळी आपल्या मुलांना एकटे बाहेर सोडू नका. काही त्रास झाल्यास मनपाने जारी केलेल्या एजन्सीच्या मोबाईल नंबरवर त्वरित संपर्क साधावा. जालन्यातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासातून दिलासा देण्यासाठी ही मोहीम कितपत यशस्वी ठरेल हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top