DLM ADVT

0

NANDURBAR | अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी येथे शालेय बसला अपघात, एक विद्यार्थी ठार 

अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी येथे शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बसला अपघात झाला असून यात एक विद्यार्थी ठार झाला असून जवळपास पंधरा विद्यार्थी गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे.जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मेहुनबारी आश्रम शाळेतील विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती आहे. विद्यार्थी दिवाळीनिमित्त सुट्टीत आपल्या गावी आले होते. विद्यार्थ्यांना पुन्हा आश्रम शाळामध्ये घेऊन जाण्यासाठी बस आली असता आज दुपारी मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावरील अमलीबारी येथील वळण रस्त्यावर बस चालकाचा तोल गेल्याने बस 100 ते 150 फूट खाली कोसळली. 

या अपघातात विद्यार्थी बस खाली दाबले गेले. यात एक विद्यार्थी मृत्यू पावला असून 10 ते 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सातपुडा भागातील रस्त्यावर छोटे अपघात होत असतात पण गेल्या दोन महिन्यात हा दुसरा मोठा अपघात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top