CHH.SAMBHAJINAGAR | छत्रपती संभाजीनगरात गाडीचोरी रॅकेटवर पोलिसांची मोठी धडक!
- डीसीपी स्वामी यांच्या आदेशावरून शहरात विशेष मोहीम राबवण्यात आली आणि या मोहिमेत गाडीचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
जवाहर कॉलनी पोलिसांच्या गस्ती दरम्यान दोन संशयित युवक विनाक्रमांकाची स्कुटी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे समर्थ काळे आणि पवन चौधरी अशी समोर आली. समर्थ काळे हा रेकॉर्डवरील गाडीचोर असल्याचेही उघड झाले.
पुढील तपासात या दोघांचा तिसरा साथीदार सोहेल बिग हा चोरीच्या गाड्यांचे बनावट कागद तयार करून विकत असल्याचे निष्पन्न झाले.
या तिघांकडून एकूण १४ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून मुद्देमालाची किंमत सुमारे ८ लाख २५ हजार रुपये इतकी आहे. जप्त गाड्यांमध्ये सिटी चौक, सिडको, वेदांत नगर, वाळूज आदी पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेल्या वाहनांचा समावेश आहे.
या कारवाईत PI सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर कॉलनी पोलिस पथकाने यशस्वी ऑपरेशन केले. जप्त केलेल्या अनेक गाड्या त्यांच्या मालकांना परत देण्यात आल्या असून नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा