CHH.SAMBHAJINAGAR | दिव-दमनमधून महाराष्ट्रात बेकायदेशीर दारूची वाहतूक — २५ बॉक्स व चारचाकीसह दोन आरोपींना ताब्यात - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक विभागाने मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला दारूचा साठा विक्रीसाठी आणणाऱ्या आरोपींना धडक दिली आहे.
दिव–दमन येथे निर्मित दारूचा साठा राज्यात आणताना पथकाने वाहनासह अडवले. २५ दारूचे बॉक्स, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले असून दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक छत्रपती संभाजीनगर अभिनव बालुरे यांनी सांगितले की, प्रतिबंधित साठा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून संबधित आरोपींवर पुढील कारवाई सुरू आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा