BULDHANA - भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचा धक्कादायक खुलासा भाजपाचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी केला आहे.
विधानसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरोधात काम करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून एक कोटी रुपये घेतल्याची कबुली अनंता शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत दिली आहे.
असाच आरोप आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस केला होता तो आज खरा ठरला आहे. भाजपाचे जिल्हा सचिव अनंता शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा