DLM ADVT

0

 धावत्या ट्रकच्या इंजन मध्ये आग लागल्याने ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना बुलढाण्याच्या सिंदखेडराजा जालना रोडवर घडली आहे. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानामुळे ट्रक मध्ये असलेले लाखो रुपयांचे सोयाबीन वाचवण्यात यश आले आहे.

 आग लागण्याचे समजतात चालकाने ताबडतोब रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून समृद्धी महामार्ग नियंत्रण कक्ष आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

 अग्निशमन दलाने ताबडतोब घटनास्थळ गाठत आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे लाखो रुपयांचे सोयाबीन नुकसान वाचले आहे. मेहकर येथून खरेदी केलेले सोयाबीन हे अहिल्यानगर या ठिकाणी नेताना ही घटना घडली आहे

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top