DLM ADVT

0


  छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची चोख आणि वेगवान कामगिरी! जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे

तब्बल २५ लाख रुपये लुटणारी टोळी पोलिसांनी अवघ्या काही तासांत गाठली आहे. धुळे–सोलापूर हायवेवर बँक कर्मचाऱ्याला ढकलून ही चोरी करण्यात आली होती.

 मात्र, ग्रामीण गुन्हेशाखेने जलद कारवाई करत एकूण ४ आरोपींना अटक केली असून संपूर्ण रोख रक्कम, वापरलेली गाडी, मोबाईलसह सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top