घटनेचा तपशील दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी फरदीन रफिक शेख (वय 25 वर्षे, रा. दादा कॉलनी, कैलासनगर, छत्रपती संभाजीनगर) याने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, दुपारी 3-30 च्या सुमारास तो आपल्या मालक आनंद अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार श्याम इलेक्ट्रिक, शहागंज येथून 4 लाख रुपये घेऊन ‘अपना बाजार’ येथे जात असताना तनिष्क ज्वेलर्ससमोर दोन अनोळखी इसमांनी चाकू दाखवून त्याच्याकडील
प्लास्टिकच्या पिशवीतील 4 लाख रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. या तक्रारीवरून पोलीसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. तपासात धक्कादायक उघड गुन्ह्याचा तपास सुरू करताच पोलिसांनी फिर्यादीची बारकाईने चौकशी केली. चौकशीत त्याने उघड केले की, तो आनंद अग्रवाल यांच्या येथे काम करीत असून, त्याच्यावर सुमारे दीड लाख रुपयांचे कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या दोन मित्रांसोबत बनाव करून लुटीची कथा रचली.
पूर्वनियोजित योजनेनुसार त्याने मालकाकडील 4 लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असताना आपल्या साथीदारांना बोलावून “लुटीचा बनाव” घडवून आणला.
पोलिसांची जलद कारवाई
तपासात फिर्यादीच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून 4 लाख रुपये रोख रक्कम जप्त केली. त्याचे दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. अटक आरोपीस न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 9 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा