DLM ADVT

0

 

छत्रपती संभाजीनगर शहरातील बहुचर्चित शिवाजीनगर भुयारी मार्ग हा दोन दिवस बंद राहणार आहे. शनिवारी बीड बायपासला पर्याय असलेला संग्रामनगर उड्डाणपूल वाहनांनी भरून गेला होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हे चित्र दिसून आले, जिथे वाहनांची अक्षरशः रांग लागली होती.

 शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 8, 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार, रविवार दोन दिवस व सोमवारी वाहनधारकांना संग्रामनगर उड्डाणपुलावरूनच ये-जा करता येणार आहे.

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बैंक प्रकल्प कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत शिवाजीनगर भुयारी मार्ग तयार करण्यात आला. या भुयारी मार्गाचे अर्धवट काम ठेऊन लोकार्पण उरकण्यात आले. पहिल्याच पावसाळ्यात भुयारी मार्गाला गळती लागली, पावसाचे पाणी साचल्याने हा भुयारी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला. 

त्यानंतरही भुयारी मार्गात पाणी साचत असल्याने त्यातून मार्ग काढताना वाहने घसरून अनेक जण अपघातात जखमी झाल्याचे समोर आले. तरी देखील या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवकर यांनी सांगितले की, शिवाजीनगर भुयारी मार्गातून वाहनधारकांना देवळाई चौकाकडे जाता येणार नसल्याने त्यांना पर्यायी संग्रामनगर उड्डाणपूल, रेल्वे स्टेशन उड्डाणपूल, एमआयटी चौक महूनगर टी पॉइंट मार्गे उस्मानपुरा या मार्गावरून ये-जा करावी लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top