धुळे शहरात असलेल्या हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा रुग्णालय येथे मोठ्या प्रमाणात वेस्ट झालेले बायोमेडिकल कचरा यामध्ये रुग्णांचे ऑपरेशन करून वेस्ट झालेले पार्ट यांची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष आरोग्य यंत्रणा काम करत असते,
मात्र ज्या कंपनीला बायोमेडिकल वेस्ट कचरा विल्हेवाट लावण्याची जबाबदारी दिली आहे ते मात्र रुग्णालयाच्या आवारातच उघड्यावर या बायोमेडिकल वेस्ट टाकून देत तो त्याच ठिकाणीच जाळण्यात येत आहे. हा सर्व प्रकार शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद लोंढे यांनी उघडकीस आणला.
या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले आनंद लोंढे व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष किरण गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेत ज्या ठिकाणी हा बायोमेडिकल वेस्ट टाकण्यात येतो त्या ठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात बायोमेडिकल वेस्ट हा उघड्यावर टाकून जाळण्यात येत होते.
त्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला डॉ. सयाजी भामरे यांनी या संदर्भात जाब विचारत लवकरात लवकर हा बायोमेडिकल वेस्ट कचरा हटवण्याचे आदेश दिले. परंतु हे उडवाउडवीचे उत्तर योग्य नाही. मात्र यावेळी शिवसेना शिंदे गटाचे सामाजिक न्याय विभागाने या गंभीर प्रकरणात संदर्भात जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता, अधिक्षक पाठक आणि संबंधित अधिकारी आणि ठेकेदारा विरोधात गुन्हे दाखल करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा