DLM ADVT

0

  

धुळ्यातील देवपूर परिसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी पांझरा नदीकाठावरून जळगाव जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून शिताफीने अटक केली आहे. दत्तु अशोक ठाकरे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील 1 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

 काही दिवसांआधी मध्यरात्री देवपूर भागातील सुयोगनगर येथील राधेशाम सोनगीरे यांच्या बंद घरातून तब्बल 4 लाख रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना तांत्रिक माहितीच्या आधारे चोपडा येथील सराईत गुन्हेगार दत्तु ठाकरे याचा सहभाग असल्याचे पोलिसांना समजले.

 यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याला धुळ्यातील पांझरा नदीकाठाहून ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या दत्तु ला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top