DHULE - पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमधील आदिवासी विद्यार्थिनीने होस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिने अवघ्या एका महिन्यापूर्वीच पिंपळनेर येथील नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
निशा वळवी पिंपळनेर येथील सामोडे रोडलगत असलेल्या एका खाजगी इमारतीतील होस्टेलमध्ये इतर विद्यार्थिनींबरोबर राहत होती. रात्री सर्वजण झोपेत असताना निशा ही बाथरूममध्ये गेली. सकाळी एका विद्यार्थिनीने बाथरूमचा दरवाजा उघडला असता निशा ही आत मृतावस्थेत आढळली. याबाबत होस्टेल कर्मचार्यांना माहिती देण्यात आली.
कर्मचारी यांनी तत्काळ पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पंचनामा केला. त्यानंतर निशा वळवी यांना पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. पोलिसांनी हा प्रकार नातेवाईकांना कळवताच कुटुंबीय सकाळीच होस्टेलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला.
नातेवाईकांनी आरोप केला की,“घटनेतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आम्ही देह ताब्यात घेणार नाही.” घटनास्थळी प्रकल्प अधिकारी जोशना पाटील सहकाऱ्यांसह दाखल झाले आहेत. तसेच पोलिस अधिकारीही पुढील तपासासाठी उपस्थित आहेत.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा