DLM ADVT

0

 

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शिवणगाव गावात रात्रीच्या सुमारात दोन दिवसात अनेक वेळा भूकंप संदृश्य धक्के बसल्याने गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालंय, रात्रीच्या सुमारास अचानक जोरदार धक्के बसल्याने गावातील लोक घराबाहेर आले होते, 

या संदर्भात अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे, तिवसाचे तहसीलदार मयूर कळसे गावात भेट देत पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला, खासदार बळवंत वानखडे यांनी यावेळी ग्रामस्थांना धीर देत जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाची संवाद साधत नेमका हा प्रकार काय आहे? वारंवार गावात का भूकंप सदृश्य धक्के बसत आहे 

याच संशोधन करा आणि ग्रामस्थांमध्ये भीती कशाप्रकारे दूर होईल याबाबत त्यांना अवगत करा अशा सूचना खासदार बळवंत वानखडे यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top