आग पाहताच व्यापारी, नागरिक आणि स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच शिरपूर वरवाडे नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने सहा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठविल्या. दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
आग विझवण्याच्या कामाला वेग आला असतानाच मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी झाली होती. प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर येत असून नुकसानाची अचूक किंमत प्रशासनाकडून पुढील तपासात निश्चित होणार आहे.
शिरपूर शहरात निवडणूक प्रचाराची जोरदार रणधुमाळी सुरू असतानाच आग लागल्याची बातमी कळताच विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी स्वतःचा प्रचार बाजूला ठेवत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांसह अग्निशमन दलाला मदत करून आग नियंत्रित करण्यास हातभार लावला. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून विजेच्या शॉर्टसर्किटची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस व अग्निशमन विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा