DLM ADVT

0

 MUMBAI | घाटकोपरच्या असल्फा विभागात जेष्ठ महिलेची हत्या, आरोपी सुनेला अटक घाटकोपरच्या असल्फा विभागात घरात एकटी असलेल्या एका जेष्ठ महिलेची हत्या झाल्याने खळबळ उडाली होती. सेहनाज अनिस काजी (६३) असे मयत महिलेचे नाव आहे.

मात्र, ही हत्या तिच्या सुनेने लुटीच्या उद्देशाने आणि प्रॉपर्टीच्या वादातून केल्याचे समजले.  सेहनाज या वृद्ध झाल्या होत्या आणि एकट्याच होत्या. त्यांच्या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला हिस्सा मिळायला हवा अशी आरोपीची इच्छा होती

. तसेच त्यांच्या दागिन्यावर ही तिचा डोळा होता. सेहनाज यांना लुटण्याचा उद्देशाने बुधवारी रात्री मुमताज त्यांच्या घरी आल्या. त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करून अंगावरील दागिने चोरून तिने पळ काढला. मात्र, पोलिसांनी कसून केलेल्या तपासात सुनेनेच ही हत्या केल्याचे स्पष्ट होताच घाटकोपर पोलिसांनी मुमताज ला कुरल्यातून अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top