DLM ADVT

0

 

छत्रपती संभाजीनगर तहसील अंतर्गत येणाऱ्या गोपाळपूर सहजपूर परिसरामध्ये काही व्यवसायिकांनी पत्राची शेड टाकून गायरान जमिनीवर अतिक्रमण केले होते.

 त्या संदर्भामध्ये गेल्या काही दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकरी महिला- पुरुष आमरण उपोषणाला बसले होते.

 त्याच अनुषंगाने आज तहसीलदार यांनी गट नंबर 26 व 27 मध्ये कारवाई करत पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केलेली दुकाने जमीनदोस्त केली. 

यामध्ये चार जीसीबी पोलीस कर्मचारी आर सिटी कमांडो फलटण अशी एकूण 30 कर्मचारी या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. अशी माहिती तहसीलदार बिडवे यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top