जालना शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात बालकांच्या जन्म प्रमाणपत्रांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची हेळसांड करण्यात येत आहे. महिनो महिने जन्म प्रमाणपत्र मिळत नसल्याने रुग्णालयात हेलपाटे मारावे लागतायत. या संदर्भात वारंवार तक्रारी करूनही रुग्णालय प्रशासन कारवाई करत नाही.
त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक वारंवार संतप्त होण्याच्या घटना वाढल्यात. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या देखील तक्रारी आहेत.
त्यामुळे तातडीने जन्म प्रमाणपत्र रुग्णांना द्या अन्यथा आंदोलनाचा इशारा महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा