छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये राजस्थान येथील एक व्यापारी उतरले असता एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते.
जेवण करताना त्यांनी बॅग आपल्या बाजूला ठेवली आणि जेवायला बसले. तेव्हा दोन अनोळखी व्यक्तींनी तेथे येऊन ती बॅग चोरून नेली. त्या बॅगमध्ये दहा हजार रुपये आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. त्यामुळे त्यांनी वेदांत नगर पोलीस ठाणे येथे येऊन तक्रार दाखल केली.
त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला आणि आरोपींना अटक केली. बॅग मूळ मालकांना परत केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा