DLM ADVT

0


छत्रपती संभाजीनगर, दि.११ सेवा हमी कायदा २०१५ च्या अंमलबजावणीत जिल्हा प्रशासनाने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. आता नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा व सेवांसंबंधित माहिती ही व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे उपलब्ध होणार आहे. त्यासाठी ९९६७२००९२५ हा क्रमांक जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

            सेवा हमी कायद्यांतर्गत नागरिकांना सेवा सुलभरित्या देता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने ९९६७२००९२५ हा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केला असून त्याद्वारे व्हॉट्सॲप चॅटबॉट द्वारे नागरिकांना सेवा देण्यात येणार आहे. या सेवांमध्ये महा ई सेवा केंद्रांचे ठिकाण, वेळा, थेट अर्ज करण्याची लिंक, सर्व सेवांची माहिती, विविध महसूल सेवांसाठी लागणारी कागद पत्रांची यादी, तक्रार दाखल करण्याचे ठिकाण, सेवांसाठी कोठे अर्ज करावा याबाबतची माहिती तसेच घरपोच सेवा हवी असल्यास त्याबाबत विनंती करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

            माहिती व तंत्रज्ञान विभागाचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक शरद दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे चॅट बॉट विकसित केले असून ते पूर्णतः कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top