NANDURBAR | मुदत संपलेल्या वाहनांवर उप प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई नंदुरबारमध्ये उप प्रादेशिक परिवहन विभागामार्फत आज शहर आणि परिसरातील मुदत संपलेल्या वाहनांवर तसेच शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षांवर विशेष कारवाई करण्यात आली.
या कारवाईदरम्यान रिक्षा, ट्रक, रेती वाहतूक करणारे ट्रक, टेम्पो आदी वाहनांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. मुदत संपूनही परवाना आणि विमा अद्ययावत न केलेल्या वाहनांवर तसेच अवैध विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत 67 शालेय विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर तसेच इतर 15 वाहनांवर जप्तीची कार्यवाही करण्यात आली. परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी सांगितले की, कागदपत्रांशिवाय रस्त्यावर धावणारी वाहने अपघातांना आमंत्रण देतात, त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करूनच विद्यार्थ्यांना वाहनात पाठवावे.

टिप्पणी पोस्ट करा