अमरावती मनपा अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या बडनेरा झोन येथील फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश वासुदेव मोहन या कर्मचाऱ्यांने 20 नोव्हेंबर रोजी सकाळी टोकाचे पाऊल उचलून आयुष्य संपविले. फायर ब्रिगेड कर्मचारी राजेश मोहन यांनी विषारी कीटक नाशक औषध प्राशन करून या घटनेला थेट वरिष्ठ अधिकारी केंद्रे सह इतर अधिकाऱ्यांना दोषी ठरविल्याचे बयान मृत्यू पूर्वी दिले.
अशातच 20 नोव्हेंबरच्या रात्री राजेश मोहन यांचा मृत्यू झाल्याने नातेवाईक चांगलेच संतापले 21 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी अचानक जिल्हा सामान्य रुग्णालय समोर नातेवाईक सह भीम ब्रिगेड चे राजेश वानखडे आणि सहकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले. यावेळी रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था अनेक तासापर्यंत ठप्प झाल्याने काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
या दरम्यान दोषी अग्निशमन अधिकारी प्रकरणाला दोषी असून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा अन्यथा अंतिम संस्कार करण्यासाठी शव ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा मृतक च्या पत्नी सह राजेश वानखडे यांनी अखेर एसीपी खताळे बडनेरा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी मध्यस्थी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन रद्द करण्यात आले.
आंदोलन दरम्यान अग्निशमन केंद्र प्रमुख केंद्रे यांच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लाचे चे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना त्यांना पदोन्नती कशी देण्यात आली याकरिता मनपा आयुक्त सौम्या शर्मा सुद्धा दोषी असल्याचा आरोप आझाद समाज पार्टी चे प्रदेश पदाधिकारी मनिष साठे यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा