JALNA | निष्कृष्ट दर्जाचा सिमेंट रोड हाताने उखडला; ग्रामसेवक आणि इंजिनियरवर कारवाईची नागरिकांकडून मागणी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक गावात पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रोड बांधण्यात आला होता. मात्र नुकतेच झालेले हे काम अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
शुक्रवारी पूर्ण झालेला हा सिमेंट रोड केवळ हाताने सहज उखडू लागल्याने ग्रामपंचायतने केलेल्या कामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारी निधीचा सर्रास अपव्यय झाल्याचा आरोप करत आज स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष रस्त्याचा भाग हाताने उखडून निष्कृष्ट कामगिरीचा पर्दाफाश केला.
याप्रकरणी संबंधित ग्रामसेवक आणि पथदर्शक इंजिनिअर यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नागरिकांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा