DLM ADVT

0

 

जालना जिल्हा हा सध्या गुन्हेगारीचा बालेकिल्ला झाल्याचे पाहायला मिळत आहे ,या जिल्ह्यात रोज वेगवेगळ्या घटना घडत आहे, खून ,दरोडे, हाणामारी, यासारखे गंभीर प्रकार जिल्ह्यात सुरू आहे, असाच एक संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणारा एक प्रकार आज समोर आला आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील नांजावाडी येथील शिवारात अवैद्य गर्भपात केंद्र सुरू असल्याचे गुप्त माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती

 या माहितीवरून आज या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता, गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. सदरची कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि आरोग्य विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एक डॉक्टर नांजावाडी परिसरातील शेतातील एका घरात अवैधरीत्या गर्भपात करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

या माहितीच्या आधारे पथकाने आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकला, सदरची कारवाई ही जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने केली आहे. ज्यावेळी या पथकाने सदर खोलीत छापा टाकला असता ही कोणी एक पत्राची खोली होती व तिच्या सिमेंटच्या बांधलेल्या भिंती होत्या यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकताच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांचे व इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले,छाप्यात संबंधित डॉक्टर तसेच गर्भपातासाठी आलेले जोडपे यांना अटक करण्यात आली. 

 घटनास्थळावर काही साहित्य, औषधे आणि उपकरणेही जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास आरोग्य विभाग तसेच पोलिसांकडून सुरू आहे. तागायत या पथकाने व आरोग्य विभागाच्या पदकाने या ठिकाणी 4 ते 5तास कसून चौकशी सुरू केली आहे, आणखी काही पुरावे सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व आरोग्य विभागाचे पथक परिसरात पिंजून काढत आहे, कारण गतवर्षीसुध्दा गर्भपाताचे रॅकेट पोलिस व आरोग्य विभागाने उघड केलेल आहे. 

आता पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे रॅकेट भोकरदन शहर परिसरात उघड झाल्याने आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, कारवाई पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पंकज जाधव, एपीआय योगेश उबाळे यांनी केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने व आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या या कारवाईबद्दल परिसरात एकच खळबळ जरी उडाली असली मात्र सर्वसामान्य नागरिकांनी या कारवाईबद्दल पोलिसांचे व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे,

 कारण कित्येक निष्पाप जीव हे डॉक्टर अवैध गर्भपात करून घेतात त्यामुळे ही कारवाई होणे अत्यंत गरजेची होती असा सूर दबक्या आवाजात सध्या संपूर्ण जिल्हा भरात सुरू आहे.यात दोन बोगस डॉक्टरांना अवैध गर्भलिंगनिदान तपासणी करताना आरोग्य विभाग व पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती आहे तर लिंगनिदान करण्याकरिता वापरण्यात येणार प्रोब व मोबाईल मध्ये असलेल्या ऍप्लिकेशनद्वारे तपासणी करण्यात येत होती. 

 गर्भपाताच्या गोळ्या असे साहित्य ताब्यात घेतले आहे, यात डॉ. गवांडे व सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भोकरदन येथील त्याच्या दवाखान्याची सुद्धा झाडझडती सध्या सुरू आहे, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून यामध्ये कुठले, डॉक्टर व कुठले कर्मचारी सहभागी आहेत, घर कोणाच आहे, कुठले डॉक्टर या ठिकाणी हा व्यवसाय करतात याचा कसून शोध गुप्त पद्धतीने सध्या पोलीस करत आहे. अशी माहिती भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दिलेले डॉक्टर कृष्णा वानखेडे वैद्यकीय अधीक्षक भोकरदन यांनी आज 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रसार माध्यमाला दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top