DLM ADVT

0


JALNA | जैन इंग्लिश स्कूलच्या वर्गाचे स्लॅब कोसळला; तीन मुले जखमी जालना शहरात आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली आहे. फुलंब्रीकर नाट्यगृह परिसरातील जैन इंग्लिश स्कूलमध्ये दुपारी साधारण 12 वाजेच्या सुमारास नर्सरी वर्गाच्या छताचा स्लॅब कोसळला. 

घटनेच्या वेळी लहान विद्यार्थी वर्गात जेवण करत होते, आणि अचानक पोपडा कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर जालना शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

 घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान, घटनेनंतर पालकांनी शाळा परिसरात मोठी गर्दी केली होती आणि शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र, जैन इंग्लिश स्कूल प्रशासनाने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top