BHIWANDI | तालुक्यातील काल्हेर येथील राजलक्ष्मी कंपाऊंडमध्ये आज भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपाऊंडच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बंग ओव्हरसीज आणि थॉमस एक्स्पोर्ट या गारमेंट कंपन्यांमध्ये ऑनलाइन रेडीमेड गारमेंट्सचे वेअरहाऊस असल्याची माहिती समोर आली आहे.
अचानक लागलेल्या आगीत तब्बल दहा गोदामे भक्षस्थानी पडली असून मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. धुराचे प्रचंड लोट दूरपर्यंत दिसत आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी दाखल झाली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

टिप्पणी पोस्ट करा