KALYAN | कल्याण स्टेशनवरून 8 महिन्याच्या बाळाची चोरी; 6 तासांत आरोपी पोलिसांच्या ताब्यात रेल्वे स्टेशनवर घडलेल्या बाळ चोरीच्या धक्कादायक घटनेचा कल्याण पोलिसांनी सहा तासांच्या आत पर्दाफाश केला आहे.
आई-वडील आपल्या तीन मुलांसह कल्याण स्टेशनच्या पुलावर झोपले असताना, एका तरुणाने त्यांच्या आठ महिन्याच्या बाळाची चोरी केली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने तत्काळ तपास सुरू करत फक्त सहा तासांतच आरोपी अक्षय खरे आणि त्याची आत्या सविता खरे यांना अटक केली.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा