KOLHAPUR | कोल्हापुरात पुन्हा भोंदूगिरीचा प्रकार उघड कोल्हापुरात अंधश्रद्धेचा कहर पुन्हा समोर! चुटकी वाजवून भूतबाधा काढणाऱ्या आणि करणी करणाऱ्या तथाकथित ‘भोंदू बाबाचा’ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टिंबर मार्केट परिसरातील हा प्रकार असल्याचे समोर आले असून, स्मशानभूमीत अघोरी पूजा आणि करणीचे विधी केल्याचा दावा करण्यात येतोय. या प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासूरकर यांनी कडक कारवाईची मागणी करत नागरिकांना अशा अंधश्रद्धांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी व्हिडिओच्या आधारे संबंधित बाबाचा शोध सुरू केला असून, सध्या कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा