KOLHAPUR | येत्या 24 नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन; शिक्षकांचा इशारा सेवेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी लागू करण्यात आलेल्या टीईटी परिक्षे विरोधात आज कोल्हापूरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारलायं.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. आमदार जयंत आसगावकर, शिक्षकनेते दादा लाड, भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढून टीईटी परीक्षा निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी टीईटी परीक्षेचा निर्णय रद्द होण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल करावी, अन्यथा येत्या 24 नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक, शिक्षिका आणि अनेक शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा