DHULE | - धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात दुपारी दीड ते दोनच्या सुमारास गायत्री आनंदा वाघ-पाटील (वय 27 वर्षे) यांनी आपल्या मुलगा दुर्गेश (वय 6 वर्षे) आणि मुलगी दुर्वा (वय 3 वर्षे) यांच्यासह गाव शिवारातील गोशाळेकडील विहिरीत उडी घेतली. कौटुंबिक वादांमुळे नैराश्यातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक प्राप्त होत आहे.
विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी असल्याने घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही. सायंकाळी तिघांचा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली. मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा