NAVI MUMBAI | पोलीस अधिकारी बनून लोकांची फसवणूक करणारा कुख्यात गुन्हेगार सज्जाद इराणी अटकेत पोलीस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे.
त्याच्यावर यापूर्वी MCOCAसह शंभरहून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून, तुरुंगातून सुटल्यावर त्याने पुन्हा फसवणुकीचे सत्र सुरू केले होते. खारघर परिसरातील वृद्ध नागरिकाची 1.5 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह फसवणूक केल्यानंतर पोलिसांनी दीर्घ तपास करून त्याला पुण्यात पकडले. या कारवाईत पोलिसांनी 1 कोटी 25 लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीकडून नवी मुंबईत अशा 16 फसवणुकींची कबुली मिळाली आहे.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा