DLM ADVT

0




 छत्रपती संभाजीनगर न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिलेल्या आरोपीला अटक करून न्यायालयात आणताच त्याने हातकडीसह धूम ठोकली. रिक्षाने जात असतांना वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान ही बाब निदर्शनास येताच त्याच्या पुन्हा मुस्क्या आवळण्यात आल्या. 

कारभारी श्यामलाल घुसिंगे असे त्याचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 2022 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने फुलंब्री तालुक्यात अमली पदार्थ विरोधात कारवाई केली होती. त्यात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यात कारभारी आरोपी होता. फुलंब्री पोलिसांनी दोषारोपपत्र सादर केले. प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊन देखील कारभारी न्यायालयात तारखेला गैरहजर राहत होता. त्या प्रकरणात न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते. 

फुलंब्री पोलिसांनी त्याला अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. सायंकाळी न्यायालयाबाहेर येताच त्यांनी पोलिसांच्या हाताला झटका देत पोबारा झाला व रिक्षात बसून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पकडले.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top