DLM ADVT

0


PUNE - पुण्यातून एक फसवणुकीची घटना समोर आली आहे. कोथरुड परिसरातील एका दांपत्याची शंकर महाराजांच्या नावाखाली तब्बल १४ कोटी रुपयांची अफाट फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.

इंग्लंडमध्ये आयटी कंपनीत उच्च पदावर काम करणारे दीपक आणि अंजली डोळस दांपत्य आपल्या दिव्यांग मुलींच्या उपचारासाठी उपाय शोधत असताना भोंदू दाम्पत्याच्या जाळ्यात अडकले.

वेदिका आणि कुणाल पंढरपूरकर या दाम्पत्यानं अंगात शंकर महाराज येतात, असा दावा करत डोळस दांपत्याला विविध भूलथापा दिल्या. घराखाली भूत आहे, पैशांना दोष आहे, अशा भीती दाखवून त्यांनी रोख रक्कम, गुंतवणूक, शेती आणि परदेशातील घरासह तब्बल १४ कोटी रुपयांची लूट केली.

मुलींची तब्येत सुधारत नसल्याचं लक्षात आल्यानंतर डोळस दांपत्यानं पोलिसांकडे धाव घेतली. फसवणूक करणाऱ्या या भोंदू दाम्पत्यानं या पैशातून बंगला घेतल्याचं डोळस डोळस दांपत्यांचं म्हणण आहे. सध्या पीडित कुटुंब भाड्याच्या घरात राहण्यास भाग पडलं असून या प्रकरणाबाबत त्यांच्या वकिलांनी सविस्तर माहिती दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top