PUNE | शरद पवारांच्या पदाधिकारी राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्यात खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खाजणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राम खाडे पुण्यातील खासगी हॉस्पिटल मध्ये एडमिट आहेत त्यांना रात्री ३ वाजता एडमिट करण्यात आल सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहे व्हेमटिलेटर लावण्यात आल आहे प्रकृती अत्यंत अत्याव्यस्त आहे
नातेवाईक कोणीही बोलायला सध्या तयार नाही त्यांना हळल्याबाबत काहीही माहिती नाही मिळालेल्या माहितीनुसार, हा हल्ला रात्री 9 ते 9:15 च्या सुमारास घडला. राम खाडे आणि त्यांचे सहकारी मांदगाव येथील पाटील हॉटेलमध्ये जेवणानंतर बाहेर पडत असताना, 10 ते 12 हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. सर्वप्रथम किशोर मुळे यांच्यावर हल्ला करण्यात आला.
त्यानंतर हल्लेखोरांनी राम खाडे यांना गाडीतून बाहेर काढून त्यांना दूर पटांगणात नेऊन त्यांच्यावर धार धार शस्त्रणी हल्ला केला. मारहाण केली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीच्या काचाही फोडल्या. हा हल्ला पूर्वनियोजित होता आणि हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले यावर त्याच्या समर्थकांनी प्रतिक्रिया दिलीये.

टिप्पणी पोस्ट करा