AHILYANAGAR | शेवगावमध्ये उसाच्या दरवाढीसाठी व काटेमारी थांबवण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात उसाच्या भाववाढीची आणि काटेमारीविरोधातील मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घोटण येथे आंदोलन सुरू आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत असून,
ऊसाला 3300 रुपयांचा भाव जाहीर करावा, मागील वर्षीचे 300 रुपये फरक दिले जावेत, तसेच काट्यामध्ये होणारी काटेमारी थांबवावी या मुख्य मागण्या संघटनेने केल्या आहेत. यासंदर्भात वजन निरीक्षकांकडून काट्यांची तपासणी आणि शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचे वजन कोणत्याही काट्यावर करण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा