मंडणगड तालुक्यातील शिरगाव परिसरात आज झालेल्या भीषण अपघाताने परिसरात खळबळ उडाली आहे. MH 08 AX 9589 या क्रमांकाची वॅगनार गाडी अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल चरामध्ये जाऊन कोसळली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण ढासळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.
रस्त्याच्या कडेला खोल चरामध्ये अडकलेल्या गाडीची अवस्था पाहून नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले. काही मिनिटांतच मंडणगड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन ग्रामस्थांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून रस्त्याची स्थिती, वाहनाचा वेग आणि तांत्रिक बाबींचा पंचनामा करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा