DLM ADVT

0


भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरामध्ये आज मोठी दुर्घटना टळली. आयवा डंपरचा ब्रेक फेल झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तब्बल सहा वाहनांना जोरदार धडक बसली.

 पथदिव्याच्या पोलला धडकून डंपर थांबल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक झालेल्या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळत आहे. दरम्यान, पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top