DLM ADVT

0

SOLAPUR |  बार्शी तालुक्यात चार वर्षाचा चिमूरडा खेळता खेळता ट्रॅक्टर वर चढला आणि गेअर पडल्यामुळे ट्रॅक्टरसहित विहिरीत पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू 

- बार्शी तालुक्यातील शेळगावातील दुर्दैवी घटना,चार वर्षाच्या चिमूरड्याचा बारा तासाच्या प्रयत्नानंतर मृतदेह काढण्यात आला 

- शिवराज शेरखाने असं ट्रॅक्टर सोबत विहिरीत कोसळलेल्या चार वर्षाच्या मुलाचे नाव

- शिवराज हा खेळता खेळता ट्रॅक्टर वर चढला आणि अचानक ट्रॅक्टर सुरू झाला.गेअर पडल्यामुळे ट्रॅक्टर वेगाने 50 ते 60 फूट खोल असणाऱ्या विहिरीत जाऊन कोसळला

- शिवराज चे वडील संदीप शेरखाने यांच्यासमोर हा प्रकार घडला 

-  विहिरीत मुबलक प्रमाणावर पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर विहिरीत बुडाला, त्यातून ट्रॅक्टर बाहेर काढताना मोठा अडथळा निर्माण झाला,ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे काम गुंतागुंतीचे होते.

- मोटरींच्या मदतीने विहिरीतील पाणी बाहेर काढण्यात आले,पाणी बाहेर काढण्यासाठी अनेक तासांचा कालावधी लागला

- तालुका प्रशासन आणि ग्रामस्थांच्या मदतीने बारा तासानंतर ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top