KOLHAPUR | कोल्हापुरातील टीईटी पेपर फुटी प्रकरणाचं कनेक्शन उत्तर भारतापर्यंत कोल्हापुरातील टीईटी पेपर फुटी प्रकरणाचं कनेक्शन उत्तर भारतापर्यंत असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यभर एकाचवेळी झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडणारी टोळी कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केली..
कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई करीत संपूर्ण टोळी पकडून रॅकेटचा पर्दाफाश केला. या टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेऊन याचा तपास पोलीस घेतायत. या प्रकरणात एकूण 18 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
कोल्हापुरात उघड झालेल्या या प्रकरणात उत्तर भारतातील अनेक राज्यांपर्यंत कनेक्शन असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा