भंडाऱ्यावरून तिरोडा दिशेने कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. हा अपघात भंडारा - तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील मोहाडी तालुक्यातील दहेगाव येथे घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पहाटे घडलेल्या अपघातानंतर तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प राहिली. यामुळे पहाटे प्रवासासाठी निघालेल्या वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.
मोहाडी पोलिस, वाहतूक पोलिस आणि ग्रामस्थांच्या मदतीनं अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या बाजूला करून खोळंबलेली वाहतूक सुरू करण्यात मदत केली.
.jpg)
टिप्पणी पोस्ट करा