सुधीर जगदाळे | विशेष संपादकीय
छत्रपती संभाजीनगरची वेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंगी गावात नुकतीच एक अशी भयंकर आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिने संपूर्ण विवेकशील समाजमनाला एक मोठा धक्का दिला आहे. दिवसभर चिखलाने माखलेल्या, घाण झालेल्या गाड्या पाण्याने आणि शॅम्पूने चकाचक धुवून देणारा एक व्यावसायिक जर स्वतःच्या मनात वासनेचा इतका घाणेरडा चिखल साचवून वावरत असेल, तर बाह्य स्वच्छतेच्या या व्यवसायामागे दडलेल्या या मानसिक विकृतीला समाज काय नाव देणार? 'मंगलदास' सारखे पवित्र नाव मिरवणाऱ्या आणि आजोबाच्या वयाच्या एका म्हाताऱ्याने, नऊ वर्षांच्या एका निरागस चिमुरडीला अर्धवट बांधकाम असलेल्या निर्जन ठिकाणी नेऊन कायद्याचे उल्लंघन केलेच कसे? स्वतःला 'दास' म्हणवून घेणाऱ्याच्या मनात नऊ वर्षांच्या निष्पाप बालिकेबद्दल असा पाशवी आणि अमंगल विचार येतोच कसा? हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. अशा ढोंगी प्रवृत्तींवर प्रहार करणारा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा एक सणसणीत अभंग आज थेट डोळ्यांसमोर उभा राहतो:
"तुका म्हणे ऐशा नरा । मोजुनी माराव्या पैजारा ॥"
समाजातील अशा विकृत प्रवृत्तींना कायद्याने वेळीच ठेचले नाही, तर आपल्या लेकी-बाळींनी सुरक्षित जगायचे कसे? हा सर्वात मोठा प्रश्न आज उभा राहिला आहे.
या घटनेतील आरोपी मंगलदास कोलते हा व्यवसायाने वाशिंग सेंटर चालवतो. दिवसभर चिखलाने माखलेल्या, घाण झालेल्या गाड्या पाण्याने आणि शॅम्पूने चकाचक धुवून देणारा हा माणूस लोकांच्या गाड्या तर स्वच्छ करत होता, पण याच्या स्वतःच्या मनात किती भयानक विकृत घाण साचलेली होती ? हाच खरा प्रश्न आहे! ज्याच्या स्वतःच्या मनात वासनेचा आणि विकृतीचा इतका घाणेरडा चिखल साचला असेल, त्याच्या बाह्य स्वच्छतेला काय अर्थ उरतो?
'मंगल' नावाचा 'अमंगल' कारनामा!
'मंगलदास' असे आरोपीचे नाव. नावाच्या सुरुवातीला 'मंगळ' म्हणजे पवित्र, कल्याणकारी आणि शेवटी 'दास'! आपल्या संस्कृतीत 'दास' या शब्दाला एक अत्यंत आदराचे आणि समर्पणाचे स्थान आहे. अनेक महात्म्यांनी 'दास' या शब्दाचा अर्थ जनसेवा, त्याग आणि पवित्रतेच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवला. 'दास' म्हणजे नम्रता, 'दास' म्हणजे रक्षणकर्ता! अशा पद्धतीचे नाव असणार्यांना अत्यंत 'अमंगल', नीच आणि पाशवी प्रवृत्तीचे कृत्य शोभते का ? आजोबाच्या वयाचा अशा वृत्तीचा माणूस ९ वर्षांच्या चिमुरडीचे रक्षण करण्याऐवजी स्वतःच भक्षक कसा बनतो ? अशा ढोंगी आणि कपटी वृत्तीच्या लोकांवर प्रहार करताना संत कबीर म्हणतात:
"कथनी मीठी खांड सी, करनी विष की लोय ।"
"कथनी तजि करनी करै, विष से अमृत होय ॥"
नावात 'मंगल' आणि मुखात 'दास' असे गोडवे गाणाऱ्या या वाशिंग सेंटरवाल्याच्या कर्मात जर नऊ वर्षांच्या चिमुरडीला ओरबाडणारे पाशवी विष भरलेले असेल, तर नावाच्या या ढोंगी मुखवट्याला समाजाने ओळखायचे कसे? तोंडात आणि नावात गोडवा मिरवून मनात वासनेच्या विषाचा घडा भरून वावरणाऱ्या अशा वृत्तीला समाजात मानाने जगण्याचा कोणताही 'नैतिक अधिकार' उरतो का ? हाच आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे!.
⚖️ FIR मधील कलमे
फुलंब्री पोलीस ठाण्यात पुढील कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे
भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 — कलम 74
POCSO Act, 2012 — कलम 8
POCSO Act, 2012 — कलम 12
🛑 अशा वृत्तीच्या लोकांची मानसिक घाण आता कायद्याच्या बडग्यानेच साफ करावी लागेल !
अशा वृत्तीच्या लोकांची मानसिक घाण आता कायद्याच्या बडग्यानेच साफ करावी लागेल. पोलिसांनी प्राथमिक कलमे योग्य लावली असली, तरी केवळ कागदोपत्री कलमे लावून चालणार नाही. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, तांत्रिक त्रुटी बाजूला सारून, आरोपीला कठोर सूडवजा नाही तर कायद्यानुसार जास्तीत जास्त मोठी शिक्षा मिळवून देणे, हीच या सावंगीतील चिमुरडीला आणि तिच्या कुटुंबाला दिलेला खरा न्याय ठरेल. अशा प्रकरणांमध्ये कायद्याचा धाक हा असलाच पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा