Top News

☕🚨 कॅनॉटमध्ये चहाच्या ग्लासवरून रक्तरंजित वाद! 😱 ‘खोकताना तोंडाला हात लाव’ म्हटल्याने डॉक्टरवर काचेचा ग्लास फेकून हल्ला! 🩸🏥


 

छत्रपती संभाजीनगर : कॅनॉट परिसरातील ‘गावठी चहा’ येथे खोकण्यावरून झालेल्या वादातून एका डॉक्टरच्या कपाळावर काचेचा चहाचा ग्लास फेकून जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पोलिसांना फोन केल्यामुळे शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.

याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गु.र.नं. 626/2026, भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 352, 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुमित सुभाष सावंत (वय 28, रा. भोकरदन पोलीस स्टेशनच्या पाठीमागे, जि. जालना) यांनी फिर्याद दिली आहे. घटना 12 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 10.30 वाजता घडली.

फिर्यादी चहा पिण्यासाठी हॉटेलवर गेले असताना तेथे एका व्यक्तीने त्यांच्या तोंडावर खोकल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे. त्यामुळे “खोकताना तोंडाला हात तरी लाव” असे सांगितल्याचा राग आल्याने संबंधित व्यक्तीने काउंटरवरून काचेचा चहाचा ग्लास घेऊन फिर्यादीच्या कपाळाच्या डाव्या बाजूला फेकल्याचा आरोप आहे. त्यामुळे जखम होऊन रक्तस्राव झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

यानंतर फिर्यादीने 100 क्रमांकावर फोन केला असता संबंधित व्यक्तीने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपीचा उल्लेख ‘चिव्या’ असा आहे. 

गुन्हा 13 सप्टेंबर रोजी पहाटे 1.53 वाजता दाखल करण्यात आला. पुढील तपास सिडको पोलीस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने