DLM ADVT

0


 

KOLHAPUR (Kolhapur Flood Alert) | नागरिकांना काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गेल्या चार-पाच दिवसांपासून कोकण (Konkan Heavy Rainfall)पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra Floods) मध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोल्हापुरातून (Kolhapur) वाहणारी पंचगंगा नदी (Panchganga River Flood Alert) पाचव्यांदा पात्राबाहेर पडली आहे.


राजाराम बंधाऱ्याच्या (Rajaram Barrage Water Level)
ठिकाणी नदीची पाणीपातळी दुपारी 12 वाजता राजाराम बंधारा (Rajaram Barrage) येथे 36 फुट, इचलकरंजी (Ichalkaranji) येथे 57 फूट 2 इंच आणि नृसिंहवाडी (Nrusinhwadi) येथे 40 फूट 6 इंच इतकी पोहोचली आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट आणि धोक्याची पातळी 43 फूट आहे.

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरस्थिती (Flood Situation in Maharashtra) गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणातून पाण्याचा विसर्ग (Dam Water Release in Maharashtra) सुरू आहे. पडणाऱ्या पावसाकडेही जिल्हा प्रशासनाचे लक्ष असून कोल्हापूर (Kolhapur Rainfall Update) ला दोन दिवस घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert IMD Maharashtra) देण्यात आला आहे.

या परिस्थितीची दखल घेऊन योग्य ती पावले जिल्हा प्रशासनाकडून उचलली जातील. पूर परिस्थिती निर्माण झाल्यास निवारा केंद्रे आणि इतर कामे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहेत. तर अलमट्टी धरणाच्या (Almatti Dam Water Release) विसर्गाबाबत जिल्हा प्रशासन सातत्याने संपर्कात आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असली तरी येणाऱ्या पूर परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज आहे.

तरही नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे (Collector Amol Yedge) यांनी केले आहे.

BYTE – अमोल येडगे (Collector Amol Yedge)

#KolhapurFloodAlert
#MumbaiRainUpdate
#MaharashtraFloods
#PanchgangaRiver
#IMDAlert
#OrangeAlert
#AmolYedge
#KolhapurNews
#MaharashtraRainfall
#FloodSituation


टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top