- कोकणात रत्नागिरी शहर परिसरात युवतीच्या खूनप्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सगळे खून दुर्वास पाटील याच्या वडिलांच्या नावे असलेला सायली बार जवळच संबंधित असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
भक्ती मयेकर खुनाचा तपास सुरू असताना दुर्वास पाटील याने एक, दोन नव्हे तर तब्बल तीन खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून सीताराम वीर (50, वाटद-खंडाळा), दुसरा खून राकेश जंगम (28, वाटद,खंडाळा), तर तिसरा खून भक्ती मयेकर हिचा खून चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांचा संशय बळावला व वाटद खंडाळा येथील आणखी एक बेपत्ता दाखल होती. त्याचा तपास सुरू असतानाच राकेश जंगम या बेपत्ता असलेल्या तरुणाचाही खून दुर्वास यानेच केल्याच्या समोर आले आहे. 27 ऑगस्ट 2025 रोजी त्याला अटक केली गेली.

टिप्पणी पोस्ट करा